सर्व 12 राशींसाठी कसा असणार आजचा दिवस? वाचा तुमचे आजचे राशिभविष्य
सर्व 12 राशींसाठी कसा असणार आजचा दिवस? वाचा तुमचे आजचे राशिभविष्य
img
Dipali Ghadwaje

आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष रास

नोकरी - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. 
व्यापार - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. 
कुटुंब - तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. 
आरोग्य - आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.

वृषभ रास

नोकरी - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.
आरोग्य - आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. 
व्यवसाय - आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.
युवक  - तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल. 

मिथुन रास

नोकरी - आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. 
आरोग्य - तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. 
व्यापार - आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. 
तरूण - मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल. 

कर्क रास

नोकरी - आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची प्रगती होईल. 
व्यापार  - आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो. अशा वेळी जास्त ताण न घेता कामाचाच एक भाग म्हणून सोडून द्या.  
तरूण - घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील. 
आरोग्य  - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 

सिंह रास

नोकरी  - तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. 
व्यापार  - आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या. 
तरूण  - आज तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकतं. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.
आरोग्य  - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. 

कन्या रास

नोकरी  - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.
व्यापार - जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.
तरूण - प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे.  तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. 
आरोग्य - दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा

तूळ रास

नोकरी - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणतीच भूमिका घेऊ नका. अन्यथा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. 
आरोग्य- जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला छातीत दुखणं, नैराश्य, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
व्यवसाय - आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची तुम्ही लवकरच निवड करावी. 
प्रेमसंबंध - जर तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबर तुमच्या भावना शेअर करायच्या असतील तर तुम्ही त्या व्यक्त करू शकतात. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल 

वृश्चिक रास

नोकरी - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना तुम्ही कोणतीच घाई-गडबड करू नका. अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो. 
आरोग्य - महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. 
व्यवसाय - जर तुमच्या व्यवसायात एखादं महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. 
युवक - आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. पण हा वाद जास्त वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही मैत्री गमवाल. 

धनु रास

नोकरी - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचे बॉस खूप खुश असतील. तुम्हाला नोकरीत बढतीची संधी देखील मिळू शकते. 
आरोग्य - ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा. 
व्यवसाय - जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. 
युवक - जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. 

मकर रास

नोकरी - आज ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. 
व्यवसाय - व्यापारात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुमचं कौतुक होईल. 
विद्यार्थी - आज तुम्हाला भूतकाळातील जुन्या गोष्टी आठवतील. या गोष्टी आठवून तुम्हाला भावूक व्हायला होईल. 
आरोग्य  - बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. 

कुंभ रास

नोकरी - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल राहून काम करणं अपेक्षित आहे. अन्यथा लोक तुमच्या स्वभाचा गैरफायदा घेऊ शकतात.
व्यवसाय - आज तुमचे विरोधक तुमचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही त्यांच्या बोलण्यात फसू नका. 
विद्यार्थी - आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल. 
आरोग्य - आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका

मीन रास

नोकरी  - तुमची निर्णयक्षमता चांगली असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय कंपनीसाठी लाभदायक ठरू शकतात. 
व्यवसाय - व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गेले अनेक दिवस तुमच्या ज्या कोर्ट-कचेऱ्या सुरु होत्या त्याला आज यश येणार आहे.
विद्यार्थी  - इतरांची जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही तुमच्याच कुटुंबीयांसाठी अडचणी निर्माण करू शकता. 
आरोग्य - तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)































इतर बातम्या
Join Whatsapp Group