आज एप्रिलचा तिसरा दिवस , कुठल्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस  ; सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
आज एप्रिलचा तिसरा दिवस , कुठल्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस ; सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
आज 03 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार गुरूवार. आज एप्रिल महिन्याचा तिसरा खास दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास 
मेष राशीच्या लोकांनो आज चिकाटी आणि स्थिरता या गुणांच्या जोरावर अडचणीचा जास्त विचार करणार नाही, नव्या उमेदीने कामाला लागाल.

वृषभ रास  
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडेल, कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी पथ्य पाणी सांभाळावे 

मिथुन रास  
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्याच्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतील, तेथे अचानक काही बदल संभवतात 

कर्क रास  
कर्क राशीच्या लोकांनो आज वरिष्ठांनी आश्वासन दिले तरी ते लगेच पूर्ण होणार नसल्याने, त्यात फारसा रस तुम्ही घेणार नाही  

सिंह रास  
सिंह राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी तुमच्याशिवाय काही चालणार नाही. महिलांनी त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा

कन्या रास 
कन्या राशीच्या लोकांनो आज आर्थिक गोष्टींमध्ये थोडी अनिश्चितता दाखवते, मित्रमंडळीशी भांडणाचे प्रसंग उदभवतील 

तूळ रास 
तूळ राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर तुमच्याकडून एक प्रकारची व्यावहारिक बैठक घातलेली तुम्हाला जाणवेल, भावना गुंडाळून ठेवून कठोर निर्णय घ्याल 

वृश्चिक रास 
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या मुलांच्या हट्टीपणामुळे त्रास होऊ शकतो, दुसऱ्याला स्वातंत्र्य देताना हात थोडा आखडताच घ्याल 

धनु रास 
धनु राशीच्या लोकांनो आज स्वतःचा विचार जरा जास्तच कराल, सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड चालू राहील.

मकर रास 
मकर राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी वादविवाद संभवतात, कोणतीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.

कुंभ रास 
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमची मते घरातील लोकांना न पटल्यामुळे वाद होतील, थोडा ताण वाढेल आणि मानसिक स्वास्थ्य गमावून बसाल 

मीन रास 
मीन राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावना प्रकट करताना संयम राखावा, तुमच्या वागण्या बोलण्यात संघर्षाचा प्रतिकारचा भाग जास्त असेल.

 
 (टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group