आज सोमवार , तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज सोमवार , तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
img
DB
आज 28 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार सोमवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य  जाणून घ्या.



मेष रास 
मेष राशीसाठी आज व्यापार उद्योगात जरा जास्त भांडवल लागू शकते, आज कोणतेच काम तातडीने होणार नाही    



वृषभ रास  
वृषभ राशीच्या लोकांनो आज पैशाची बाजू समाधानकारक राहिली घरामध्ये जोडीदार अशी थोडी मतभेद संभवतात, परंतु ते जास्त काळ टिकणार नाहीत 

मिथुन रास 
मिथुन राशीच्या लोकांनो आज धंद्यात भागीदार अशी तडजोड करण्या व्यतिरिक्त काही मार्ग दिसणार नाही, महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे 

कर्क रास  
कर्क राशीच्या लोकांनो आज कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील सरकारी कामे अडली असतील, तर ती आज करायला हरकत नाही 

सिंह रास 
सिंह राशीच्या लोकांनो आज कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी मित्रमंडळींचे सहकार्य सहज मिळेल 

कन्या रास 
कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये स्पर्धेला तोडीस तर उत्तरे द्याल आणि कामाचा फडशा पाडाल    

तूळ रास 
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी मिळवाल, मानसिक स्वास्थ्य मिळेल  

वृश्चिक रास  
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अचानक धनलाभाच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा, स्त्री वर्गाकडून फायदा होईल   

धनु रास  
धनु राशीच्या लोकांनो आज अध्यात्माची आवड असणाऱ्यांची उपासना मार्गात प्रगती होईल, आर्थिक स्थिती सुधारेल

मकर रास 
मकर राशीच्या लोकांनो आज ज्या गोष्टींची इच्छा कराल त्याची इच्छापूर्ती होईल, तरुण आधुनिक फॅशन कडे ओढ घेतील.

कुंभ रास  
कुंभ राशीच्या लोकांनो आज मोठ्या भावंडांबाबत फायद्याच्या गोष्टी घडतील, महिला कामाला जास्त महत्त्व देतील    

मीन रास 
मीन राशीच्या लोकांनो आज संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, त्यांच्यासाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल.

 
 (टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर  कोणताही दावा करत नाही.)
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group