आज 08 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार मंगळवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होईल, आपले प्रस्ताव ज्येष्ठांसमोर मांडायला हरकत नाही.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज एकंदरीत मन आनंदी ठेवणारा दिवस, महिलांना संतती सौख्य लाभेल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींचा सहवास लागेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज मित्रांच्या सहकार्याने बरीच कामे मार्गी लागतील.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांचा खेळीमेळीत अभ्यास होईल, व्यापारात आर्थिक लाभ झाल्यामुळे मागील बरीच देणे देता येतील,
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज माननीय प्रतिष्ठा मिळण्याचे प्रसंग येतील आणि त्यातून आर्थिक लाभही होऊ शकतात
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज जरा जास्त श्रम करावे लागतील, तर यश पदरात पडेल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज राजकारणात पुढाकाराने अनेक गोष्टी कराल, लोकांच्या पसंतीला उतराल
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे वाद संभवतात.
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज सुखात काही कमतरता आहे, असे सतत जाणवत राहील
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज काही गुप्त गोष्टी करण्याकडे कल राहील, उष्णतेच्या विकारापासून सावधानता बाळगावी
मीन रास
मीन कुंभ राशीच्या महिलांना आज थोडे जास्त श्रम पडतील, नवनवीन प्रयोग करायला आवडेल.
(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)