आज 31 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार सोमवार. आज स्वामी समर्थ प्रकटदिनाचा खास दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
मेष राशीच्या लोकांनो अंथरूण पाहून पाय पसरावेत साथीचे रोग किंवा संसर्गजन्य आजारांपासून सावधानता बाळगा
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, परंतु तेथे थोडी दिशाभूल होण्याची शक्यता आहे
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज संधी मिळून सुद्धा संधीचे सोने करण्यासाठी लागणारी ग्रहाची साथ थोडी कमी मिळणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल, धंद्यामध्ये भागीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल, धंद्यामध्ये भागीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज महिला स्वतःच्या मनाप्रमाणे इतरांना वागायला लावतील. कडक बोलण्यावर बंधन ठेवावे.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारची तडफ दिसेल, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा मोह टाळू शकणार नाही
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जबाबदारीचा वसा हाती घेऊन ती पार पाडण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज तुमचा आत्मविश्वास इतरांना आश्चर्यचकित करेल, तुमच्या कामातील पारदर्शीपणा तुम्हाला फायदा कडे घेऊन जाणार आहे
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज शारीरिक त्रास होण्याची शक्यता, स्थावर इस्टेट संबंधी कोणतेही निर्णय घेऊ नयेत.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणतीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल, महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही निर्णय घाईने घेऊ नयेत, प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम चोख ठेवण्याकडे कल ठेवावा
(टीप : वरील सर्व बाबीत दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)