कसा असेल आजचा दिवस ? १२ राशींचे आजचे राशिभविष्य वाचा
कसा असेल आजचा दिवस ? १२ राशींचे आजचे राशिभविष्य वाचा
img
दैनिक भ्रमर

मेष

मेष राशी साठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे पूर्ण लक्ष द्याल. तुमच्या नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवन चांगले होईल. आज व्यवसायात प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील, यामुळे तुम्हालाही आनंद होईल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक कार्यात यश मिळेल. आज तुमचे मन आनंदी राहील.

वृषभ 

तुमच्या दिवसाची सुरुवात खर्चाने होईल.  आईकडून अधिक प्रेम मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावंडांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बाहेर फिरायला जाणे पुढे ढकलले तर बरे होईल. तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सरप्राईज पार्टी देखील प्लॅन करू शकता. कार्यक्षेत्रात दिवस अनुकूल असेल. आज अनावश्यक धावपळ होईल. तसेच मनात थोडी चिंता राहील. मानसिक शांतता लाभेल. 

मिथुन  

 आरोग्याशी संबंधित समस्या उदभवू शकतात. एवढेच नाही तर शिक्षणातही व्यत्यय येणार आहे. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आज तुमच्या नात्यात काही आव्हाने येतील. तुमच्या कोणत्याही मित्राला तुमच्या प्रेम जीवनात हस्तक्षेप करू देऊ नका. कौटुंबिक जीवनात तणाव राहील. ऑफिसमध्ये एखाद्याशी भांडण होऊ शकते. कायदेशीर अडथळे दूर करून लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रवासादरम्यान तुमचे सामान सुरक्षित ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल.

कर्क

कामाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही मनापासून काम कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल तसेच चांगले फळ देखील मिळेल. लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च होईल ज्यामुळे मन दुखी होईल. एखादी दुखापत किंवा पोटदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य राहील. प्रेम जीवनात गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतो. 


सिंह

दिवसाची सुरुवात चांगली होईल. खर्चावर नियंत्रण राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला तुमचा बायोडाटा पाठवल्याचा नोकरीत फायदा मिळू शकतो. कुटुंबात प्रेम राहील आणि तुम्हाला तुमच्या आईचे सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी दिवस शुभ आहे. 


कन्या 

आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. करिअर क्षेत्रात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. दिवशी इतरांच्या कामात ढवळाढवळ न करणेच चांगले. प्रवास करताना काळजी घ्या. तुमच्या प्रियकराशी वाद झाल्याने तुमचे नाते बिघडू शकते. मात्र वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय चांगला चालेल. मुलांशी संबंधित चिंता कमी होईल. प्रयत्न केल्यास रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

तुळ 

आजचा दिवस तुम्हाला फिरायला जाण्यासाठी अनुकूल आहे. जर तुम्ही बिझनेससाठी प्रवासावर असाल तर आज तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात केलेल्या प्रवासात यश मिळेल. खर्च प्रचंड असेल त्यामुळे तुमचे बजेट आधीच ठरवा. नवीन कार्य योजना यशस्वी झाल्यामुळे तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. प्रेम जीवनात तणाव राहील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आज पैसे मिळणे सोपे होईल. तुम्हाला प्रेम प्रस्ताव मिळू शकतो. 

वृश्चिक - 


तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. प्रत्येक काम तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकता. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळू शकते. आनंदात वाढ होईल किंवा एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या प्रेम जीवनातही आनंदाचे क्षण येतील. मात्र वडिलांसोबतचे तुमचे नाते बिघडू शकते. आज वाईट संगत टाळावी. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि समाधान मिळेल.


धनु 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो; प्रेमाच्या बाबतीत काळजी घ्यावी. तुमचे प्रेमप्रकरण सर्वांसमोर उगड होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस ठीकठाक आहे. मात्र तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

मकर 

आज आनंदाची बातमी मिळू शकते.  कुटुंबात आनंद राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. खर्च वाढतील पण आज तुम्हाला बिझनेसमध्ये एखादी डील मिळेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.

कुंभ 

 तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. वाहन जपून चालवा. कुटुंबात काही गोष्टींबाबत गैरसमज निर्माण होईल. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरतील. प्रवास सुखकर होईल कामाच्या ठिकाणी दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला तणाव आणि थकवा जाणवेल. मेहनत केल्यानंतर नोकरीत अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि समाजात तुमच्या कामाला महत्त्व मिळेल.

मीन  

आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज असेल त्यामुळे ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या सर्व कामात बळ देईल. कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. आरोग्य बिघडेल परंतु दुपारनंतर स्थिती सुधारेल. आईकडून काही फायदा होऊ शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group