'चार नेत्यांना अटक करण्याचा मविआचा डाव' ; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप
'चार नेत्यांना अटक करण्याचा मविआचा डाव' ; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप
img
दैनिक भ्रमर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्ल्यूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडी सरकारवर खळबळजनक आरोप केले. महाविकासआघाडी सरकारचा भाजपच्या चार बड्या नेत्यांना अटक करण्याचा डाव होता, असे आरोप मुख्यमंत्र्यांनी केले.

'महाविकास आघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना अटक करण्याचा डाव होता. फडणवीस यांना अटक करून भाजप फोडण्याचा डाव होता. याआधीही आनंद दिघे यांना संपवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी इनसिक्युरीटीमुळे एकाएकाला संपवलं', असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केले आहेत.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज! राज्यातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष

'राज ठाकरेंचं मन मोठं आहे. मोकळ्या मनाचा माणूस आहे. पण उद्धव ठाकरे हे कद्रू, कोत्या मनाचे नेते आहे. ज्यांनी घोटाळे केले त्यांना श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा हिशेब विचारण्याचा अधिकार नाही. आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे यात फरक आहे. मुळात शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होणं पचनी पडलं नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 'आपल्याच माणसांना संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून बंड केलं. बाळासाहेब पक्षासाठी लढले, उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी लढले. मी दबावाखाली कुठलंही काम केलं नाही. मला पुत्रमोहापायी बाजूला केलं. मुळात मी कधीच आदित्य ठाकरेंच्याविरोधात नव्हतो, पण उद्धव ठाकरेंना पक्षात मास लिडर नको होता, त्यांना फक्त हुजरे हवे होते, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

16 जागा लढणार

शिवसेनेला 16 जागा मिळणार आहेत. ठाणे,नाशिक मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळणार आहे. विरोधकांनी मला कायम लाईटली घेतलं, पण विरोधकांचे गळ्यात गळे पायात पाय आहेत. ज्यांची तिकीटं कापली त्यांचं पुनर्वसन करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group