भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलील्या या यादीमध्ये तामिळनाडूतील १५ आणि पुद्दुचेरीतील एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या यादीनुसार चेन्नई उत्तरमधून आर. सी. पॉल कनगराज, तिरुवल्लूरमधून पॉन व्ही बालगणपति, तिरवन्नमलाई येथून ए अश्वथामन, नामक्कल येथून के पी रामलिंगम, त्रिपुर येथून एपी मुरुगनांदम, पोलाची येथीन के वसंतराजन, करून से वीवी सेंथिलनाथन आणि चिदंबरम येथून श्रीपती पी कार्तियायनी यांना तिकीट मिळालं आहे.
याव्यतिरीक्त नागपत्तिनम येथून एस जी रमेश, तंजावुर येथून एम मुरुगानंदम, शिवगंगा येथून देवनाथन यादव, मदुराई येथून राम श्रीनीवासन, विरुद्धनगर येथून राधिका शरतकुमार आणि टेनकासी येथून जॉन पांडियान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अन्नामलाई आणि केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्यासह राज्यातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
या यादीनुसार सौंदर्यराजन चेन्नई दक्षिणमधून तर मुरुगन निलगिरीमधून पक्षाचे उमेदवार असतील. अन्नामलाई यांना कोईबतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रलमधून व्ही. पी. सेल्वम, वेल्लोरमधून ए. सी. षण्मुगम, कृष्णागिरीतून सी. नरसिंहन, पेरंबलुरमधून टी. आर. परिवेंदर आणि तुतीकोरिन (तूतुकुडी) मधून एन. नागेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.