उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; आगीचं कारण गुलदस्त्यात
उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; आगीचं कारण गुलदस्त्यात
img
Dipali Ghadwaje
उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या भीषण स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीमधील CS2 या डिपार्टमेंटमध्ये सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. आग अधिक पसरू नये म्हणून अग्निशमन दलाकडून काळजी घेतली जात आहे.

या कंपनीत नायट्रोजनच्या टँकरमध्ये सी.एस.टू हे केमिकल भरत असताना टँकरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर या परिसरातील घरांना हादरे बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

दरम्यान सेंचुर रेयॉन या नामांकित कंपनी  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची शक्यता वर्तवली जातीय. जखमींना कंपनीच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. शैलेश यादव, अनंता यादव, राजेश श्रीवास्तव अशी मृतांची नावे आहेत. तर सागर झालटे, पंडित मोरे, हंसराज सरोज प्रकाश निकम अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. या घटनेमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सेंच्युरी कंपनीत नायट्रोजन टॅंकरमध्ये सी.एस.टू हे केमिकल भरत आज सकाळच्या दरम्यान हा स्फोट झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच कामगार जखमी आहेत. त्यातील चौघांवर सेंच्युरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर एका जखमीला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आगीचं कारण गुलदस्त्यात
फॅक्ट्रीच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, आग कशाने लागली? त्यामागचं कारण काय हे काहीच सांगण्यात आलेलं नाही. अग्निशमन दलाकडून या आगीची प्राथमिक चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group