नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसांपासून गंगापूर धरण क्षेत्रात, तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असल्याने गंगापूर धरणातून बुधवारी दुपारी 2272 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे रामकुंड परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग दि. 27 रोजी 1 वाजता 4469 क्यूसेक्स होता. तो 3 वाजता 1614 क्युसेक्सने वाढवून एकूण 6083 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदाकाठावरील शेतकरी व रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.