उद्योग जगतातील रत्न हरपला; उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
उद्योग जगतातील रत्न हरपला; उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
img
दैनिक भ्रमर
भारताच्या उद्योग क्षेत्रातील रत्न, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते.

रतन टाटा यांना 6 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं.

आणखी वाचा >>>> भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर २० वर्षांपासून असलेल्या नोकरानेच मारला डल्ला
इतर बातम्या
Join Whatsapp Group