रतन टाटांचा अगदी तरुण मित्र म्हणजे शंतनू नायडू. रतन टाटा यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याबरोबर होता शंतनू नायडू त्या मोजक्या लोकांपैकी एक आहे जो रतन टाटा यांच्या अतिशय जवळ होता.
शंतनू टाटा हा टाटा ट्र्स्टचा डिप्युटी मॅनेजर आणि रतन टाटा यांचा खासगी सहायक म्हणून काम करत होता. शंतनू नायडून जानेवारी 2025 पासून जनरल मॅनेजर आणि हेड स्ट्रॅटेजिक इनिशेटिव्ज म्हणून टाटा मोटर्समध्ये कामाला आहे.
एका मुलाखती दरम्यान शंतनू नायडूला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा शंतनूने आपल्या आईला कशी सून हवी हे सांगितलं आहे. शंतनूची आई ही पुण्यातील मनपा शाळेत गेली 30 वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांनी शंतनूकडे अशी इच्छा व्यक्त केली आहे की, त्याने मराठी मुलीशीच लग्न करावं. यावर शंतनूने सांगितलं की, जे असेल ते आता गोड मानून घ्यायचं .
शंतनू नायडू बोलतो अस्सल मराठी?
शंतनू नायडूच शिक्षण हे पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून झालं आहे. एवढंच नव्हे तर त्याची आई गेली 30 वर्षे मनपा शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मुलाखतीच्या सुरुवातीला शंतनू सांगतो की, तो पुणेरी मराठी बोलू शकतो.
शंतनू गेली कित्येक वर्षे मुंबईत कार्यरत आहेत. शंतनू टाटा मोटर्समध्ये कार्यरत आहे. पण यासोबतच तो वेगवेगळी उपक्रम राबवतो. Bookies असाच त्याचा एक उपक्रम आहे. तसेच वृद्ध व्यक्तींसाठी आणि भटक्या कुत्र्यांसाठी देखील शंतनू वेगवेगळे उपक्रम राबवतो.
शंतनूचं खरं वय काय?
शंतनू नायडू 2014 मध्ये रतन टाटा यांना भेटला. वयाच्या विशीमध्ये तो 70 वर्षीय रतन टाटा यांचा मित्र झाला. खूप कमी वयापासून शंतनू चर्चेत आहे. पण त्याचं आता नेमकं वय किती हा प्रश्न अनेकांना पडतो. शंतनू नायडू हा 33 वर्षांचा आहे. भारतीय संस्कृतीनुसार हे त्याच्या लग्नाचं वय असल्यामुळे त्याला कशी बायको हवी? असा प्रश्न त्याला मुलाखती दरम्यान विचारण्यात आला.
कोण आहे शंतनू नायडू?
शंतनू नायडूटा जन्म 1993 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे एका तेलुगू कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर, शंतनूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर, त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए केले. जिथे त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. शंतनू 2017 पासून टाटा ट्रस्टशी संबंधित आहेत आणि सध्या टाटा ग्रुपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत आहे.