ऐन निवडणुकीत सापडलं कोट्यवधींचं घबाड ; रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात
ऐन निवडणुकीत सापडलं कोट्यवधींचं घबाड ; रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात
img
Dipali Ghadwaje
कल्याण : आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे . राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विधानसभा मतदासंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

दरम्यान एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील ड्युटीवर आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारसंघातील घडामोडी आणि पैशांच्या देवाणघेवाणी चांगलंच लक्ष्य आहे. अशातच आयकर विभागाने कल्याणमध्ये ५ कोटींची रोकड ताब्यात घेतली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार , कल्याण शीळ फाटा रोडवर कोट्यवधींची रोकड पकडण्यात आली आहे. या रोडवर पाच कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे.

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या वाहनात रोकड आढळली आहे. रोकडबाबत माहिती पुरावे देऊ न शकल्याने भरारी पथकाने रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात दिली. ऐन विधानसभा निवडणुकीत कोट्यवधींची रोकड सापडल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group