विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार? बैठकीत नेमकी चर्चा काय?
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार? बैठकीत नेमकी चर्चा काय?
img
DB
लोकसभा निवडणुकीनंतर आता पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय घडामोडी घडत आहेत. 

सध्या मुंबईच्या कार्यालयात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक  सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत यामध्ये चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. याबाबतची या बैठकीत चर्चा सुरु आहे. 

दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीला दिग्गज नेते उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री, गिरीश महाजान, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आदि नेते मंडळी उपस्थित आहे. 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group