मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी नवीन दावा केला आहे . ज्या सुदर्शन घुलेची देशमुखांसोबत मारहाण झाली त्याला त्याच्या 'आका'चा फोन आला असं धस म्हणाले. त्यामुळे या हत्या प्रकरणात आरोपींना आदेश देणारा आका कोण असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील हा आका कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत धस यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात आता पुढे आणखी काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचे ठरेल.