आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्षांतरांचे वारे जोरदार वारे वाहत आहे. अनेक आजी, माजी आमदार खासदार , जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष यांच्याकडून पक्षप्रवेश करण्यात येत आहे.
त्यातच आता दोन पक्षांच्याच विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरदार सुरु आहे. याबाबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे ?
वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कसलीच चर्चा नसल्याने असे विलिनीकरण वगैरे कोसो दूर आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण, असा काही निर्णय करायचा झाला तरी त्याबाबत भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे विलिनीकरणाचे काही निर्णय घ्यायचे झाल्यास त्याची कल्पनाही भाजपाच्या नेत्यांना द्यावी लागेल, असे स्पष्ट मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
अजित पवार पुढचे मुखमंत्री ?
अजित पवार मुख्यमंत्री बनण्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही वास्तववादी आहोत. अनेकदा ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांच्या वाट्यालाही महत्त्वाचे पद येते. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून लढणार, यावर सुनील तटकरे यांनी सांगितले की, महायुती म्हणूनच लढणार. पण, त्या-त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेतले जाईल.