समृद्धी महामार्गाला जेमतेम एक वर्ष बांधून पूर्ण झाल आहे. मात्र समृद्धी महामार्गावर कुठे खड्डे पडले आहेत तर कुठे पुलावरून लोखंडी भाग तुटून वर आल्याचे दिसत आहे.
काल रात्री समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ चॅलेंज 319 जवळ मुंबई कॉरिडॉर वर एका मोठ्या पुलावर पुलाचा लोखंडी भाग तुटून हा महामार्गावर आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली होती .
मात्र एका वाहन चालकाने थांबून याचा व्हिडिओ बनवून तात्काळ जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली . त्यामुळे मात्र अनेक वाहनांचे मोठे अपघात टळले आहेत.
समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा ही 120 किलोमीटर प्रति तास असल्याने या महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय जास्त असतो व अशातच अशा लोखंडी भागाला जर वाहन धडकले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आज एका वाहन चालकाच्या समय सुचकतेने हा प्रकार टळला आहे.