बॉडी शेमिंग करणाऱ्यांची बोलती बंद! कतरिनाचा घायाळ करणारा अंदाज
बॉडी शेमिंग करणाऱ्यांची बोलती बंद! कतरिनाचा घायाळ करणारा अंदाज
img
Nandini khandare More
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने7 नोव्हेंबर 2025 रोजी कतरिनाने मुलगा विहान कौशलला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या लूक आणि पोस्टपार्टम वजनाचीही सोशल मीडियावर चर्चा झाली. अलीकडेच एका अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तिच्या वाढलेल्या वजनावरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र,आता अभिनेत्रीने आपल्या स्टायलिश अंदाजातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, आता अभिनेत्रीने आपल्या स्टायलिश अंदाजातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

कतरिना आपल्या ब्युटी ब्रँड 'के ब्युटी'च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडनला गेली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक कलरच्या स्टायलिश आउटफिटमध्ये कतरिना अतिशय ग्लॅमरस दिसत असून तिच्या विविध पोझमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

फोटो शेअर करताना कतरिनाने लंडनमधील या खास क्षणांविषयी आनंद व्यक्त केला. तसेच, यूकेमध्ये 'के ब्युटी'च्या वर्धापनदिनाचं सेलिब्रेशन करत असल्याचंही तिने आपल्या कॅप्शनमधून सांगितलं.

                                                            
इतर बातम्या
Join Whatsapp Group