मोठी बातमी : निवडणुकीआधीच बॉम्बस्फोट ;  २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
मोठी बातमी : निवडणुकीआधीच बॉम्बस्फोट ; २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
img
Dipali Ghadwaje
पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात निवडणुकीआधीच मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानात निवडणुकीच्या मतदानाआधीच दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान निवडणुकीच्या एक दिवस आधी एका अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाबाहेर स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी, सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुक पार पडणार आहे. दरम्यान बलुचिस्तानच्या पिशीन जिल्ह्यातील नोकंडी भागात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. 

येथून अस्फंद यार खान काकर हे अपक्ष उमेदवार आहेत. दुपारी त्यांच्या निवडणूक कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. अचानक मोठा स्फोट होऊन आग भडकली. आरडाओरडा करत लोक सैरावैरा धावले. या स्फोटात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा NA-265 मध्ये हा स्फोट झाला. सर्व जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group