कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू; १ जखमी
कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू; १ जखमी
img
Dipali Ghadwaje
पाकिस्तानमधून आगीची भीषण दुर्घटना समोर आली आहे.पाकिस्तानातील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज म्हणजेच शनिवार 25 नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीये. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  पाकिस्तानमध्ये एका शॉपिंग मॉलला शनिवारी (२५, नोव्हेंबर) भीषण आग लागली. या आगीमध्ये ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कराचीतील स्थानिक रुग्णालये आणि पोलिसांनी रुग्णालयांमध्ये नऊ मृतदेह आणण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आली नसून सध्या तपास सुरू आहे.

जिल्हा उपायुक्त अल्ताफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर 22 लोकांना मॉलमधून वाचवण्यात आले आणि त्यांना जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर जेपीएमसीमध्ये हलवण्यात आले, त्यापैकी एकाचा उपाचाराआधीच मृत्यू झाला. 

तसेच या दुर्घटनेनंतर चौथ्या मजल्यापर्यंत इमारत रिकामी करण्यात आली आहे, तर पाचवा आणि सहावा मजला रिकामा करण्याचे काम सुरू आहे.  

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group