१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा.... ; मनोज जरांगेंनी दिला इशारा
१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा.... ; मनोज जरांगेंनी दिला इशारा
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर : मी धनगर, ओबीसी बांधवांना विरोधक मानलं नाही. कधी आयुष्यात मानणार नाही. कुणी काय करायचे हे लोकांना माहिती आहे. लोक हुशार झालेत. पुढचा धमाका होणार आहे. १३ तारखेपर्यंत गप्प आहे. मराठा समाजाला सरकारने फसवू नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगेसोयरेची अंमलबजावणी आमच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. १३ तारखेपर्यंत मी काही बोलणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अंतरवाली सराटी येथे जाऊन बसणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. ६ जुलैपासून मराठा समाज जनजागृती रॅली जिल्ह्याजिल्ह्यात निघणार आहे असं त्यांनी सांगितले.

माझ्या शब्दाचा काहीजण गैरसमज निर्माण करतायेत. मी २०-२२ वर्षापासून लढा देतोय. प्रत्येक क्षण समाजासाठी दिला आहे. समाजाला आणि आंदोलनाला खाली मान घालावी लागेल असं कुणी बोलू नका. विचारपूर्वक बोला. आंदोलनाला कोट्यवधी मराठ्यांचा हातभार आहे. समाजात गैरसमज पसरवू नका असं आवाहन टीका करणाऱ्या मराठा समाजातील नेत्यांना जरांगेंनी केले आहे. 

दरम्यान, मराठ्यांचे नेते आता फोन करतायेत, आम्ही सोबत आहोत. सगळ्या पक्षातील ओबीसी नेता एकवटला, मराठा समाज पाठिशी पण मराठा नेते एकटवले नाहीत. मला घाण घाण बोलणारे आहेत. समाजासाठी बोलणं ऐकायला काय फरक पडतो, माझा अपमान झाला, जातीसाठी पचवला. आजही माझ्यावर अनेक संकटे आहेत. समाज एकाबाजूला राहिला तरी आम्ही आरक्षण घेऊ. मी एकटा जरी राहिलो तरी लढणार असं मनोज जरांगे म्हणाले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group