मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळणार,
मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळणार, "या" बड्या नेत्याने थेट तारीखच सांगितली
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटी येथून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. लवकरात लवकर आरक्षण द्या, अन्यथा मुंबईत येऊन आमरण उपोषण करत मोठं आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या मागणीवर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

"मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळणार, पण त्यासाठी जरांगे यांनी फेब्रुवारीपर्यंत सरकारला वेळ द्यावा, आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली जाईल", अशी माहिती शिंदे गटातील नेते संजय सिरसाट यांनी दिली आहे.

संजय सिरसाट यांनी शनिवारी मुंबईत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला सरकार नक्कीच आरक्षण देईल, अशी हमीही  दिली. दरम्यान "मराठा आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय, की सरकार सकारात्मक भूमिका घेतंय. हैदराबाद येथून कुणबींच्या नोंदी आणल्या गेल्या आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाची पुर्नगठण करण्यात आलंय. नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे. सरकार सर्व कामे बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रयत्न करत" असल्याचंही सिरसाट म्हणाले.

दरम्यान, सरकारसोबत ४ भिंतीच्या आत चर्चा केली असती, तर मला सरकारनेच संपवलं असतं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना सिरसाट म्हणाले, जर तुम्हाला संपवायचंच असतं, तर सरकारने मनमोकळ्यापणाने चर्चाच केली नसती. ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, ती फसवण्यासाठी नाही, असंही सिरसाट म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group