मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला  सुरुवात ....
मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात ....
img
Mukund Baviskar
नाशिक ( प्रतिनिधी ) : मराठा समाजाला शासनाने ३० दिवसात आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक शहरात साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उपोषण करीत आहेत. 

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थी यशस्वी ठरली असून मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले आहे, मात्र अद्यापही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. 

जालना पोलिसांनी तेथील ग्रामस्थांना लाठीचार्ज केला व आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपोषण करतेवेळी जरांगे पाटील आजही ठामपणे शांततेच्या मार्गाने मागणी करीत आहेत. मराठावाड्यातील एक सामान्य मराठा मावळा हा ठामपणे उपोषण करीत असताना त्याला पाठिंबा म्हणून संपूर्ण राज्याची ठिकाणे आंदोलन उपोषण सुरू आहे. 

दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यात आजपासून शांततेच्या मार्गाने शिवाजी महाराज स्मारक यांच्या आवारात साखळी उपोषण करण्याचा निर्णय जिल्ह्यातील विविध मराठा संघटनांनी घेतला आहे. 

आजपासून या साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. उपोषणाच्या नियोजन नुसार पहिला दिवस असून नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत आहे, तर दुसरा दिवस कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवस नियोजन अद्याप बाकी आहे, असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, राम निकम, संदीप रकटे, विशाल निकम, मनीष पवार, हिनामण वाघ, योगेश कापसे, गिरीश आहेर, अनिल कोळणे, अॅड. कैलास खांडबहाले, योगेश नाटकर, अमोल साळुंखे, करण गायकर, नितीन रोटे पाटील, सचिन काळे आदी उपस्थित होते.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group