नाशिकच्या
नाशिकच्या "या" 2 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली; "यांची" झाली नेमणूक
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- नाशिकच्या 2 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली झाली असून 3 नवीन सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकला मिळाले आहेत.

राज्यातील 68 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज सायंकाळी शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी काढले.
नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांची बदली हिंगोली शहराच्या उपविभागीय अधिकारी म्हणून तर सिद्धेश्वर धुमाळ यांची अंजनगाव, अमरावती ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

नाशिकला 3 महिला सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाल्या आहेत. त्यात पद्मजा बढे या मीरा भायंदर येथून, सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उप अधीक्षक म्हणून असलेल्या अनुराधा उदमले व संगिता निकम यांची नाशिक शहरात बदली करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group