मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा एकूण १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस दलातील १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्या व्यतिरिक्त १ सहाय्यक पोलीस आयुक्त व ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई पोलीस दलात करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकांऱ्यांनी दिल्याची माहिती आहे.

  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group