राज्यात लवकरच पोलीस भरती, वाचा सविस्तर
राज्यात लवकरच पोलीस भरती, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यात लवकरच पोलीस भरती  होणार आहे . यामुळे अनेक तरूणांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.  दरम्यान , राज्यात नुकतीच एक भरती प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये जवळपास 35 हजार तरुणांना पोलीस सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली. मात्र, या भरतीमध्ये अपयशी ठरलेल्या किंवा नव्याने प्रयत्न करत असलेल्या तरुणांना डिसेंबर महिन्यातील भरतीमुळे संधी मिळणार आहे.पोलीस भरती राबविण्यासाठी राज्य सरकार पाठिमागील अनेक वर्षांपासून विचार करत आहे.

दरम्यान, सन 2022 मध्ये भरतीबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष भरती 2023 मध्ये झाली. या भरतीमध्ये पोलीस दलातील सर्वच जागा भरल्या गेल्या नाहीत. अद्यापही अनेक जागा रिक्त आहेत. या जागांसाठीच डिसेंबरमध्ये भरती केली जाणार आहे. दरम्यान, पदे आणि एकूण जागांबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. त्याबाबत अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपण माहिती घेऊ शकता.

तसेच , सेवानिवृत्ती, बदली, बडतर्फी, बडती अशा विविध कारणांमुळे पोलीस दलात अनेक जागा रिक्त होतात. त्या जागा जर वेळीच भरल्या नाहीत तर त्या साचत राहतात आणि त्याचा एकूण आकडा मोठा होतो. अशा वेळी राज्य सरकारवरही एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती करणे एक आव्हान असते. कारण, नव्याने भरती केलेल्या पोलिसांसाठी वेतनाची व्यवस्था, इतर यंत्रणा उभी करण्यासाठीही मोठा खर्च होतो. त्यामुळे राज्य सरकार नेहमीच भरतीचे आश्वासन देते. मात्र, जाहीर केलेल्या एकूण भरतीच्या आकड्यापेक्षा टप्प्याटप्प्याने भरती काढते.

दरम्यान, राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये नुकतीच पोलीस भरती पार पडली. या भरतीमध्ये आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा पार पडली. इतर जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया अजूनही सुरु असून लवकरच ती पूर्ण केली जाणार आहे. राज्य सरकारने त्याबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांकडील मनुष्यबळ वाढल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सुलक्षेतही मोठी वाढ होणार आहे. मनुष्यबळ वाढल्याने राज्यातील गुन्हेगारी बऱ्यापैकी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. राज्य पोलीस दलामध्ये संधी मिळावी यासाठी राज्यभरातील तरुण प्रयत्नशील असतात. गावखेड्यातील तरुणांसाठी हे नोकरीचे एक महत्त्वाचे दालन समजले जाते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group