"महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार"; शिंदे गटाचे नेते ठाकरेंकडे परत येणार, बड्या नेत्याचा दावा
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे गटात परतण्यासाठी अनेकांचे शिवसेनेतील अनेकांची मातोश्रीवर फोन आणि निरोप येत आहेत. लोकसभेपूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार,असल्याचं त्यांनी म्हटलंय. २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असंही यावेळी  राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान विनायक राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 

काय म्हणाले विनायक राऊत ?
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतील गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना शहाणपण शिकवू नये, २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

मराठा आणि ओबीसी यांच्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. त्यांना दोन्ही समाज धडा शिकवेल, अशी टीकाही राऊत यांनी केली. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्यांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. लोकसभेपूर्वी शिवसेनेते मोठा भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.
 
शिंदे गटाच्या १३ खासदारांपैकी केवळ तीन जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आमच्यासमोर आली आहे. त्यामुळे काही जणांचे मातोश्रीवर फोन सुरू झाले असून अजूनही काही जण निरोप पाठवत आहेत. आमचं चुकलं असं सांगून परत येण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गौप्यस्फोट देखील विनायक राऊत यांनी केला आहे.

तर दुसरीकडे  विनायक राऊत यांचा दावा उदय सामंत यांना हाणून पाडला. कुणी कितीही दिवा स्वप्न बघितली. तरी सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीनंतर पूर्ण देश हा मोदीमय तसेच भाजपमय झालेला असेल. आमचे आमदार-खासदार त्यांच्या (ठाकरे गटाच्या) संपर्कात असण्यापेक्षा जे शिवसेनेचे नेते म्हणून जाहीर झालेले आहेत. त्यातील काहीजण एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, असं उदय सामंत म्हणाले. दरम्यान विनायक राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group