सर्व 12 राशींसाठी आजचा शनिवारचा दिवस नेमका कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
सर्व 12 राशींसाठी आजचा शनिवारचा दिवस नेमका कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
img
Dipali Ghadwaje
आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?   जाणून घ्या आजचे राशीभविष्य. 

मेष रास 

नोकरी  - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. आपल्या कामात सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

व्यवसाय   - व्यापारी वर्गाने भागीदारीत व्यवसाय करताना नीट खात्री करून घ्या. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. 

युवक  - तरूण वर्गाला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच तुम्हाला यश प्राप्त होईल. 

आरोग्य - आज तुम्ही डोळ्यांच्या त्रासाने हैराण होऊ शकता. यासाठी हलगर्जीपणा करू नका, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

वृषभ रास

नोकरी  - आज कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिक्सपासून दूर राहा. अन्यथा तुम्ही यात अडकू शकता. 

व्यवसाय   - आज व्यापारी वर्गाला अनपेक्षित लाभ भेटू शकता. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. 

युवक   - तरूण वर्गाने आज कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. 

आरोग्य  - आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बीपीच्या त्रासाने त्रस्त असू शकता. 

मिथुन रास
 
नोकरी  - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. कामाच्या अधिक ताणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. 

व्यवसाय  - जर तुम्हाला नव्याने तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ चांगली आहे. 

युवक - आज भावा-बहिणींबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. घरातून विनाकारण बाहेर पडू नका. 

आरोग्य  - ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातून विनाकारण बाहेर पडू नका. 

कर्क रास 

नोकरी - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल. फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. 

व्यापार  - व्यवसायात तुमची प्रगती चांगली असेल. अनेकजण तुमच्या व्यवसायाने प्रभावित होतील. त्यामुळे तुम्हाला अधिक उत्साहित वाटेल. 

तरूण  - आजचा दिवस तुमचा कुटुंबियांबरोबर आनंदात जाईल. धार्मिक स्थळाला भेट ज्या. मानसिक शांती लाभेल.

आरोग्य - आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त अॅसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.

सिंह रास 

नोकरी  - कामाच्या ठिकाणी जास्त भावनिक होऊ नका. सर्व निर्णय प्रॅक्टिकल होऊनच घ्या. आयुष्यात पुढे जाल.

व्यापार  - आज तुमच्या व्यवसायातील लोकांशी सामंजस्याने वागा. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तरच योग्य व्यवसाय होईल.

तरूण - स्पर्धा परीक्षेला बसलेले तरूण आज मनापासून अभ्यास करतील. आपलं ध्येय लक्षात ठेवून अभ्यास केला तर स्वप्न लवकर साकार होईल. 

आरोग्य  - आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका. 

कन्या रास  

नोकरी  - आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीत तुमच्या सहकाऱ्यांचा सपोर्ट घ्यायला कोणताच संकोच करू नका. तुम्हाला याचा फायदाच होईल. 

व्यापार  - आज व्यापाराशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबडीत निर्णय घेतल्यास तुम्हाला नुकसान भोगावं लागू शकतं. 

तरूण - आज तुमचा स्वभाव फारच मूडी असेल. एका क्षणात आनंदी तर दुसऱ्या क्षणाला दु:खी असाल. 

आरोग्य  - तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका. 

तूळ रास  

नोकरी - आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. तुमच्या बुद्धीने तुम्ही अनेक कामं पूर्ण कराल.

व्यवसाय - व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं, कारण ग्रहण बदलल्यामुळे तुमच्या जीवनात कर्जाबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

विद्यार्थी - तुमच्या परीक्षा जवळ आल्या असतील तर तुम्ही परीक्षेची तयारी अधिक जोमाने करायला हवी.

आरोग्य - दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे. 

वृश्चिक रास 

नोकरी - सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

व्यवसाय - इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहकांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुमच्याकडे जेवढे ग्राहक असतील तेवढा तुमचा व्यवसाय उत्तम चालेल.

विद्यार्थी  - आज त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या समस्यांवर सहजतेने मात कराल, आज तुमचा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खूप खर्च होऊ शकतो.

आरोग्य  - आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु रास  

नोकरी  - आज तुम्हाला ऑफिसला जाण्याचा फायदा मिळू शकतो. तसेच, तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील.  

व्यवसाय  - प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्ही जी कोणती डील कराल त्यात तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी   - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य  - आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी क्षुल्लक समस्या असतानाही निष्काळजीपणा करू नका, उलट डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर रास 

नोकरी  - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. कामात चपळता दाखवा. 

व्यवसाय - तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. 

युवक  - जर काही कारणास्तव तुमच्या अभ्यासात ब्रेक लागला असेल तर तुम्ही अभ्यास पुन्हा सुरु करू शकता. 

आरोग्य  - तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. 

कुंभ रास  

नोकरी  - तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल. पण, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. 

व्यापार - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे. 

लव्ह लाईफ  - आज तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही कारणास्तव खटके उडू शकतात. सामंजस्याने निर्णय घ्या. 

आरोग्य - महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मीन रास 

नोकरी  - ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. 

व्यवसाय - व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका. 

युवक  - आज तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. मग ते शाळेच्या संदर्भात असो, महाविद्यालय किंवा अगदी घरी. कडक शिस्त पाळा. 

आरोग्य   - आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो. 


(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group