मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत फोन येताच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या गावी आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईला नेण्यात येणार आहे.