अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, लंके यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार असा राहिला आहे. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके याचं घर आजही पत्र्याचं आहे.
शिवसेना शाखा प्रमुख ते आमदार
सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले निलेश लंके व त्यांचे ९ जणांचे आजही पत्र्याच्या घरात राहतात. एक रूम, छोटंस किचन, बाजूला बाथरूम असे लंके यांचं घर आहे. निलेश लंके यांचे वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि आता ते सेवानिवृत्त आहेत. लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेले लंके 2004 मध्ये राजकारणात आले. त्यांनी याची सुरुवात शिवसेना शाखा प्रमुख पदापासून केली.
राजकीय प्रवास
हंगा शिवसेना शाखा प्रमुख (2004)
हंगा ग्रामपंचायत सदस्य (2004)
सुपा गण प्रमुख (2005)
सुपा विभाग प्रमुख (2006)
शिवसेना उपतालुका प्रमुख पारनेर (2008)
ग्रामपंचायत सरपंच हंगा (2010)
पारनेर सेना तालुका प्रमुख (2013)
तालुका प्रमुख शिवसेना सोडली 2018
राष्ट्रवादीत प्रवेश जानेवारी (2019)
राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली (2019)
मताधिक्य - 59838