भंडारा : मध्यप्रदेशातील तरुणीसोबत सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नाची गाठ बांधली गेली. विवाह झाल्यानंतर गावातील मंडळींकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद मिळावे यासाठी गावात स्वागत समारंभ कार्यक्रमाने नियोजन केले होते. मात्र विवाह स्वागत समारंभाच्या दोन दिवसाआधी नवविवाहीत तरुण बेपत्ता झाला. आज या विवाहित तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या आलेसुर गावात हि घटना घडली आहे. राहुल राऊत (वय २८) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुलचे लग्न मध्यप्रदेश सरकारच्या विशिष्ट योजनेचा अंतर्गत झाले होते. ज्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील एका मुलाचा आणि मुलीचा विवाह सामुदायिक परिषदेत केला जातो.
नवविवाहित जोडप्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत राहुलचे लग्न २१ फेब्रुवारी रोजी लखनवाडा गावात एका परिषदेद्वारे करण्यात आले होते.
परंतु कुटुंब आणि समाजातील परंपरा लक्षात घेऊन रीतिरिवाजांनुसार गावात लग्न समारंभ ३० एप्रिलला होणार होता. परंतु या विवाह स्वागत समारंभापूर्वीच राहुल हा घरी कुणालाही न सांगता घरून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून आला नाही. या प्रकरणी पोलिसात देखील तक्रार देणार आली होती.
दरम्यान राहुल हा मागील चार दिवसांपासून बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह गावालगत शेतशिवरात एका विहिरीत आढळून आला आहे. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नोंद केली असून राहुलने आत्महत्या केली की, त्याची कुणी हत्या केली याचा शोध आता गोबरवाही पोलीस करीत आहे.