महत्वाची बातमी : मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद ; नेमकं काय कारण ?
महत्वाची बातमी : मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद ; नेमकं काय कारण ?
img
Dipali Ghadwaje
 भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये असणाऱ्या सक्रिय दहशतवादी तळांवर नेम साधत अचूकपणे लक्ष्यभेद केला आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. मात्र या हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. परिणामी यामुळं अनेक सेवा प्रभावित झाल्या. यामध्ये हवाई वाहतुकीचाही समावेश होता. 

पाकिस्तानवर करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर भारतात बुधवार, 7 मे 2025 रोजी साधारण 7, 430 उड्डाणं रद्द करण्यात आली होती. देशातील उत्तर, पश्चिमी आणि मध्य क्षेत्रात असणाऱ्या विमानळांना याचा फटका बसला. तर, गुरुवारीसुद्धा या परिस्थितीत फारशी सुधारणा दिसली नाही. 

मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही 8 मे 2025 रोजी 6 तासांसाठी बंद राहील असं वृत्त विमानतळ प्रबंधकांकडून समोर आलं. इथं विमानतळाचा रनवे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत देखभालीच्या कामासाठी बंद राहणार असून प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचं पूर्वनियोजन करावं आणि विमानाच्या बदललेल्या वेळांवर लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलं. 

रनवेची मान्सूनपूर्व देखभाल करण्यासाठी म्हणून हे काम हाती घेण्यात आलं असून, तिथं देशभरात सतर्कता म्हणून काही विमानतळं बंद असल्यानं मुंबईतही याच कारणानं विमानतळ बंद ठेवण्यात आल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र लगेचच त्यामागचं प्रत्यक्ष कारणही समोर आलं. 
 
ऑपरेशन सिंदूरनंतर दुसऱ्या दिवशी नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या उत्तर, पश्चिम आणि मध्य भागातील 27 विमानतळं नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शनिवार (10 मे) सकाळी 5.29 वाजेपर्यंत या विमानतळांवर उड्डाण सेवा बंद राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 

भारतीय विमान कंपन्यांनी 8 मे रोजी 430 उड्डाणं रद्द केली यामध्ये एकूण नियोजित उड्डाणांपैकी 3 टक्के उड्डाणांचा समावेश होता. यात पाकिस्तानी विमान कंपन्यांनी 147 उड्डाणं रद्द करण्यात आली. 

तर, काश्मीर ते गुजरात दरम्यान भारताच्या पश्चिम हद्दीवरील हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी रिकामं असल्याचं पाहायला मिळालं.  तर, विदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळत मुंबई आणि अहमदाबाद मार्ग निवडला. 

कोणकोणती विमानतळं बंद?

श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, अमृतसर, लुधियाना, पतियाला, भटिंडा, हळवारा, पठाणकोट, भुंतर, शिमला, गगल, धर्मशाला, किशनगढ, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केसोड, भुज, ग्वाल्हेर आणि हिंडन ही विमानतळं शासकीय आदेशानंतर बंद ठेवण्यात येत असून काहि विमानतळं फक्त लष्करी सेवांसाठीच सुरू राहतील. तर, चार्टर्ड सेवांची विमानतळंसुद्धा बंद राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group