खळबळजनक : वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; इमारतीवरून मारली उडी
खळबळजनक : वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; इमारतीवरून मारली उडी
img
DB
मंत्रालयात पुन्हा एकदा एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,   मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. या व्यक्तीने मंत्रालयातील जाळीवर उडी का घेतली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

अरविंद बंगेरा हे वडापाव विक्रेते आहे. अरविंद बंगरेा हे बोरिवली येथे राहतात. अरविंद बंगेरा यांनी उडी मारल्यानंतर पोलिसांची धावाधाव झाली. बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीची अधिक चौकशी सुरु आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group