जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयात बसवणार कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयात बसवणार कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यातील महायुती सरकारने  बुधवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच सिंगल यूज प्लास्टिकविरोधात मोहिमेला गती देण्यासाठी मंत्रालयात कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आखलीय, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

या मोहिमेचा भाग म्हणून मंत्रालयातील सर्व विभागांना त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिक वस्तू एकत्र करून जमा करण्यास सांगण्यात आलंय.

राज्याचा पर्यावरण विभाग दररोज मंत्रालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रात्यक्षिक म्हणून गुरुवारी मंत्रालयात कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आखत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्याचे आदेश : मंगळवारी एक आदेश जारी करून सर्व विभागांना मंत्रालयातील त्रिमूर्ती येथील त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यास सांगितलंय.  
 
खरं तर केंद्रातील मोदी सरकारने 2018 ला देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू मिळणे बंद झाले होते. या बंदीमध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश होता.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्या वस्तूंची यादी जाहीर केली होती, ज्यावर बंदी घालण्यात आलीय. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो किंवा फेकून देऊ शकतो आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group