रामटेकमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका ; 'वंचित'चा मोठा निर्णय
रामटेकमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका ; 'वंचित'चा मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची डोकेदुखी काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आधी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यातच काँग्रेसचे नेते किशोर गजभिये यांनी बंडखोरी करत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेत काँग्रेसची चिंता वाढवली आहे. कारण काँग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभिये यांना वंचितने पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

रामटेक लोकसभा मतदारसंघ सुरवातीपासूनच चर्चेत आहे. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर महायुतीसह अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला. पुढे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. शेवटी रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे यांनी यावेळी डमी अर्ज भरल्याने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पण याचवेळी काँग्रेसचे नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी देखील उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात प्रयत्न केले होते. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा काँग्रेसला धक्का दिला. असे असतानाच आता रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने किशोर गजभिये यांना पाठींबा जाहीर केल्याने काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

भाजपचा वचननामा नसतो तर...; आदित्य ठाकरेंचा मोंदीवर हल्ला

गजभिये यांनी आंबेडकरांचे आभार मानले

रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत उमेदवार शंकर चहांदे यांच्या जागी किशोर गजभिये यांना समर्थन दिले आहे. समर्थानाबद्दल किशोर गजभिये यांनी प्रकाश आंबेडकरांचे आभार व्यक्त केले आहे. या समर्थनाने निवडणुकीत निकाल बदलावणार असेल असा विश्वास किशोर गजभिये यानी व्यक्त केला आहे. 

महाविकास आघाडीच्या जागावाटपात रामटेकवरून चढाओढ

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत बऱ्यापैकी खलबत झाली. ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसकडून या जागेवर दावा करण्यात आला होता. शेवटी शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील चढाओढीत ही जागा काँग्रेसला आपल्या पदरात पडून घेण्यात यश आले होते. अनेक अडथळ्यांची खिंड भेदत सरतेशेवटी काँग्रेसने महाविकास आघाडीत जागा ओढून तर आणली, पण तरीही या मतदारसंघातील काँग्रेससमोरील संकट अजूनही सुरूच आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group