‘वंचित’च्या पाचव्या यादीत १० उमेदवारांची नावे जाहीर ; कुणाकुणाला संधी?
‘वंचित’च्या पाचव्या यादीत १० उमेदवारांची नावे जाहीर ; कुणाकुणाला संधी?
img
दैनिक भ्रमर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 5 वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीतून वंचितने आणखी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर उत्तर मुंबईतून वंचितकडून उत्तर भारतीय उमेदवार देण्यात आला आहे.

दक्षिणमध्य मधून वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान निवडणूक लढवणार आहेत. याआधी त्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली होती. उत्तर मुंबईतून बीना रामकुबेर सिंह उमेदवार असणार आहेत. तर धाराशिवमधून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगडमधून कुमुदानी चव्हाण यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील तीन जागांवर वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

'हे' कायदे लागू होऊ देणार नाही ; ममता बॅनर्जी यांचा पुनरुच्चार

कोणाला कोठून उमेदवारी

वंचितकडून आणखी 10 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. रायगड, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

1. दक्षिण मध्य मुंबईमधून वंचितचे अध्यक्ष अबुल हसन खान – मुस्लीम
2. उत्तर मुंबई – बीना रामकुबेर सिंह उमेदवार – क्षत्रिय
3. धाराशिव – भाऊसाहेब आंधळकर – लिंगायत
4. रायगड – कुमुदानी चव्हाण – मराठा
5. उत्तर पश्चिम मुंबई – संजीव कुलकोरी – ब्राम्हण
6. दिंडोरी – गुलाब बरडे – भिल
7. पालघर – विजया म्हात्रे – मल्हार कोळी –
8. भिवंडी – निलेश सांबरे – हिंदू कुंबी
9. नंदुरबार – हनुमंत सुर्यवंशी – टकरे कोळी
10. जळगाव – प्रफुल्ल लोढा – जैन
इतर बातम्या
Join Whatsapp Group