गणपती बाप्पा मोरया! विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आज दिमाखात आगमन, सर्वत्र लाडक्या बाप्पाचा  जयघोष .....
गणपती बाप्पा मोरया! विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आज दिमाखात आगमन, सर्वत्र लाडक्या बाप्पाचा जयघोष .....
img
Dipali Ghadwaje
गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 19 सप्टेंबर... आज श्री गणेश चतुर्थी ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला प्रारंभ होईल. 

बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.

लालबागच्या राजाची पहाटे पाच वाजता प्राणप्रतिष्ठा
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतींपैकी एक म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाची पहाटे 5 वाजता प्राणप्रतिष्ठा झाली.  विधीवत पूजा झाल्यानंतर लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळी सहा वाजल्यापासूनच रांग लागली आहे.  


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना 
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील  सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गणेश भक्त उपस्थित होते.प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुला करण्यात येईल.



इतर बातम्या
Join Whatsapp Group