नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पोलिसांनी 256 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

1 ते 18 सप्टेंबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 पोलीस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 45 पोलीस निरीक्षक, 125 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 860 पोलीस अंमलदार, 290 महिला पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस अंमलदार 1 कंपनी, स्ट्रायकिंग फोर्सचे 2 चमू, 1050 होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा

पळसेच्या महिला सरपंचाला महिला सदस्याकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या इसमावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group