पळसेच्या महिला सरपंचाला महिला सदस्याकडून मारहाण; पहा व्हिडिओ
पळसेच्या महिला सरपंचाला महिला सदस्याकडून मारहाण; पहा व्हिडिओ
img
Chandrakant Barve
नाशिकरोड प्रतिनिधी (चंद्रकांत बर्वे ): येथून जवळच असलेल्या पळसे ग्राम पंचायत च्या महिला सरपंच यांना महिला सदस्य यांनी राजीनामा देण्याच्या कारणावरून मारहाण केली.सरपंच महिलेने नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अडीच वर्षापूर्वी पळसे ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विष्णू गायखे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवला, तर जगन आगळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विकास पॅनलने पाच जागा जिंकल्या. राजकीय खलबते होऊन परिवर्तन पॅनलच्या प्रिया दिलीप गायधनी, ताराबाई होणाजी गायधनी यासह तीन सदस्यांनी विकास पॅनलला समर्थन देत सत्ता स्थापनेचा दावा केला.

17 पैकी 10 जागा विकास पॅनल कडे असल्यामुळे पहिल्या आठ महिन्याकरिता सुरेखा गायधनी या सरपंच पदी विराजमान झाल्या. त्यानंतर सुशिक्षित व उच्चशिक्षित प्रिया दिलीप गायधनी यांची सदस्यांनी सरपंच पदी निवड केली. गावाचा कारभार व विकासाची गंगा प्रिया गायधनी या सरपंच महिलेने पळसे गावात आणली. मात्र त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ताराबाई गायधनी या सदस्य महिला वारंवार करत होत्या. 

आज सकाळी सरपंच प्रिया गायधनी या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना महिला सदस्य ताराबाई होणाजी गायधनी यांनी कार्यालयात येऊन "तुम्ही राजीनामा द्या" या कारणावरून वाद घालीत सरपंच प्रिया गायधनी यांना मारहाण केली. ग्रामपंचायत कार्यालयात मोठा गदारोळ झाला. काही ग्रामस्थ व सरपंच यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेमुळे शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group