नाशिक : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना अचानक दोन तरुणांची हाणामारी झाली. त्यामुळे ऐन मिरवणूक सुरु असताना झालेल्या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून दोघांनाही पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, काही वेळासाठी झालेल्या गोंधळामुळे बघ्यांनी मिरवणूक सोडून हाणामारी पाहण्यासाठी गर्दी केल्याचेही दिसून आले.
दरम्यान सकाळपासुन नाशिककरांची गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावर पाय ठेवायला जागा नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मिरवणूक भद्रकाली परिसरात असताना अचानक दोन तरुणांची हाणामारी झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या या दोघांमध्ये तुफान राडा झाला. काही वेळात एकमेकांची डोकीही फोडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. यात एकजण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
नक्की काय घडल?
सकाळपासुन गणेशोत्सवाचा मोठा उत्साह नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. सकाळी शहरातील वाकडी बारव येथून गणेश विसर्जन मिरवणुकाला सुरवात झाली. भद्रकाली परिसरात मिरवणूक आली असताना दोन तरुणांची हाणामारी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. मात्र या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने रकताच्या थारोळ्यात खाली पडला होता. पोलिसांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. नेमकी हाणामारी कशामुळे झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही, तसेच दोघांची ओळखही पटू शकली नाही. मात्र ऐन मिरवणुकीत झालेल्या राड्यामुळे बघ्यांचा ताफा थेट मिरवणुकीतून हाणामारीकडे गेल्याचे पाहायला मिळाले. सध्या मिरवणूक सुरळीत सुरु असून भद्रकाळीपासून पुढे हळूहळू सरकत आहे.