प्रभादेवी पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका; 'हे' आहे कारण...
प्रभादेवी पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका; 'हे' आहे कारण...
img
Dipali Ghadwaje
मुंबई : गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात गणेशोत्सवाच्या वेळी कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून राडा आणि गोळीबार झाला होता. याच पार्श्ववभूमीवर यंदा  प्रभादेवी पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या तीनही पक्षांना स्वागत मंडप उभारण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये म्हणून यंदा प्रभादेवी परिसरात स्वागत मंडप उभारण्याची परवानगीच देण्यात आलेली नाही.  

प्रभादेवी परिसरात मनसेने 12- 13 वर्षापूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली. नंतर काही वर्षांनी सदा सरवणकर आमदार झाल्यानंतर त्यांनी देखील या मंडपासमोर गणेशोत्सवाला सुरुवात केली होते. शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले.  शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेनेत उभी फूट पडली. सदा सरवणकर हे शिंदेंच्या बंडात सहभागी होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तिसरा मंडप उभारला. बंडामुळे आधीच वातावरण तापलेले असताना गणेशविसर्जनाच्या दिवशी दोन्ही गट आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गटात वाद झाला, गोळीबार दाखल झाला त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये सदा सरवणकरांना क्लीन चीट देण्यात आली. 

तिन्ही पक्षांकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू
यंदा पुन्हा तिन्ही पक्षांनी गणेशोत्सव काळात मंडप उभारण्याचे परवानगी मागणारे पत्र  पोलिसांना दिली. परंतु गेल्या वर्षी घडलेला प्रकार लक्षात घेता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत तिन्ही पक्षांना मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना तिथे गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. तिन्ही पक्षांकडून सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. तिन्ही पक्षांना प्रभादेवी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्ष त्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या प्रकारानंतर कोणालाही परवानगी  देण्यात येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group