मुंबई : घरगुती तसेच पाच दिवस आणि गौरी गणपतींना आज निरोप देण्यात येत आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. पाच दिवसांचा पाहुणाच घेऊन पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पा निघाले असून अनेक ठिकाणी विसर्जनाला देखील सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतय.
दरम्यान प्रशासनाकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी कृत्रिम तलांवाची निर्मिती देखील करण्यात आलीये. लाडक्या बाप्पाला अगदी भक्तीभावने आणि जड अंत: करणाने निरोप दिला जातोय.
मुंबईतील चौपाट्यांवर देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. दादर, गिरगाव, जुहू चौपाटीवर सध्या विसर्जनाची लगबग सुरु झालीये.
त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झाल्याचं चित्र सध्या आहे. तर विसर्जनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन तैनात झालं आहे. तर विसर्जनासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची तरतूद देखील चौपाट्यांवर प्रशासनाकडून करण्यात आलीये.
वाहतूक कोंडीचा त्रास
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. मालजीपाडा-ससुनवघर, बापाणे ब्रीज आणि फाउन्टन हॉटेल जवळील महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळे ही वाहतुक कोंडी झाली. . शनिवार विकेंड असल्याने, तसेच आज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने वाहने महामार्गावर मोठ्या प्रमाणात निघाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास अनेकांना सहन कारावा लागतोय.