नांदगाव : नांदगाव जिल्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिठ्ठा नजीक असलदे पियाळी पूलावरील दुभाजकाला कार धडकली. या अपघातात सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जागीच ठार झाले. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , यशवंत भास्कर तांबे (वय ३५, रा. वैभववाडी) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे . ही धडक इतकी जोरात होती की गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.
मुंबई गोवा महामार्गावरून वैभववाडीच्या दिशेने यशवंत भास्कर व आणखी दोघेजण कारने जात होते , नांदगाव नजीक असणाऱ्या असळदे नदीच्या पुलावर आले असता मध्यभागी असणाऱ्या दुभाजकाच्या संरक्षक कठड्याला कार धडकली, दरम्यान या अपघातात यशवंत तांबे जागीच ठार झाले तर इतर दोघांमधील एक जण जखमी असून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
या अपघाताची माहिती मिळताच सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अधिक तपास पोलीस करत आहेत