नांदगाव : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहर हिंदू समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी हल्ल्यात मयत झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून येथील हुतात्मा चौकात पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना देण्यात आले.
जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहर बंदचे आयोजन सकल हिंदू समाज वतीने करण्यात आले होते.जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार (दि. २८) रोजी पुकारण्यात आलेल्या नांदगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील व्यावसायिकांनी आपली व्यापाऱ्यांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेवत नांदगाव बंदमध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने शहरातील मेडिकल,हॉस्पिटल , दुध डेअरी, अत्यावश्यक सेवा, सुरू होत्या.
शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. हिंदुस्थानचा मुकुटमणी व कश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे जिहादी कट्टरपंथी प्रवृत्तीच्या आतंकवाद्यांनी हिंदू व्यक्तींना फक्त हिंदू म्हणून मारले. त्याचा निषेध नांदगाव तालुका सकल हिंदूं समाज वतीने करण्यात आला.
नांदगाव तालुक्यात भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्वस्तरातून तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात सातत्याने नागरीकांना त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना ठोस उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. याशिवाय पाकीस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, असे येथे व्यक्त करण्यात आले.
येथील हुतात्मा चौकात दुपारी 4:00 वाजता पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.आणि पोलिस निरीक्षक चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजातर्फे जम्मुकाश्मीर पहलगाम येथे निष्पाप हिदूंनवर झालेल्या दहशतवाद्याचा हल्ल्याचा जाहीर निषेध करीत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, यांना निवेदन देण्यात आले.