नांदगाव जवळ ट्रॅक्टर उलटून दोन मजूर महिलांचा मृत्यू
नांदगाव जवळ ट्रॅक्टर उलटून दोन मजूर महिलांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
नांदगाव (भ्रमर वार्ताहर) :- शेतात कामासाठी महिला मजुरांना घेऊन  जाणारा ट्रॅक्टर दहेगांव शिवारात पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिला मजुर ठार झाल्या असून एक जण  गंभीर जखमी झाला; मात्र सहा मजूर महिला यामध्ये बचावल्या आहेत.

नेहरूनगर, दत्तनगर, गंगाधरी येथील  सकाळी शेतात कामासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर दहेगावच्या दिशेने जात असताना दहेगाव येथील आण्णा साळूबा कॉर्नर यांच्या शेतात काम करण्यासाठी गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास  ट्रॅक्टर रस्त्यांच्या कडेला नाल्यात पलटी झाला. यात ट्रॅक्टरवर पुढे बसलेल्या महिला मजूर आशाबाई चंद्रभान त्रिभुवन (वय 65 रा. नेहरूनगर, नांदगाव) व ताराबाई रवींद्र भवर (वय 40, रा. दत्तवाडी, गंगाधरी, ता. नांदगाव) या ट्रॅक्टरखाली दाबून जागीच ठार झाल्या, तर अरुण दशरथ यशवंते (वय 40) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच जवळच कांद्याच्या खळ्यावर असलेल्या नागरिकांनी अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत जखमींना मदत केली. दहेगाव   रस्त्यावर पलटी ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला नाल्यात पलटी झाल्याने नाल्यात  पाणी असल्याने ट्रॅक्टर खाली दबलेल्या महिलांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. या महिलांना जे. सी. बी. च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. 

या अपघाताची माहिती मिळताच मजुरांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉ. काजल तुसे यांनी आशाबाई चंद्रभान त्रिभुवन व ताराबाई रवींद्र भवर यांना मयत घोषित केले, तर ट्रॅक्टरचालक शिंदे व सहा महिला मजूर बचावल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group