स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि बदलामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे.
वेगाने होणारे पक्षप्रवेश , स्थानिक पातळीवर पक्षांची गुंतागुंत यामुळे या निवडणूका लक्ष वेधत आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने खातं उघडल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
नांदगाव नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीपूर्वीच प्रभाग क्रमांक आठ 'ब'मध्ये शिंदे सेनेला यश मिळालं आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवार खान जुबेदाबी यांची बिनविरोध नगरसेवकपदावर निवड झाली आहे. या निवडीने राज्यात निवडणुकीपूर्वीच विजयाचं पहिलं खातं हे शिवसेनेने उघडलं आहे.
नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ 'ब'मधून शिवसेना (शिंदे गटाच्या) खान जुबेदाबी गफार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे शिवसेनेचा (शिंदे गट ) पहिला उमेदवार विजयी झाला असून निवडणुकीपूर्वीच याठिकाणी शिवसेनेला यश मिळालं आहे.