नांदगाव तालुका खुनांच्या घटनांनी हादरला; 15 दिवसांत तिसरा खून
नांदगाव तालुका खुनांच्या घटनांनी हादरला; 15 दिवसांत तिसरा खून
img
दैनिक भ्रमर

नांदगाव (वार्ताहर) :- नांदगाव तालुका खुनाच्या घटनांनी हादरून गेला आहे. गेल्या 15 दिवसांत तिसरा खून झाल्याचे समोर आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यायडोंगरी ते बोलठाण रोड परिसरातील संपतनगर या ठिकाणी अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार न्यायडोंगरीमधील गट नंबर 847/3 च्या समोरील भागात घडला असून, अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती गावातील कैलास देवीदास आहेर यांनी नांदगाव पोलिसांना दिली होती.

नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मोरे व वाहनचालक साईनाथ आहेर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नांदगाव ग्रामीण रुग्णालय येथे  शवविच्छेदनासाठी  आणल्याची माहिती नांदगाव पोलिसांनी दिली असून, या घटनेचा पुढील तपास नांदगाव  पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group