मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली असून आता दिल्लीनंतर आता महाराष्ट्राच्या राजधानीत कॉक्रोच जनता पार्टीचं ) आंदोलन सुरू आहे.आज महात्मा गांधींच्या जयंतीदिनीच सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन पुकारले आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक घटना घडलीय. एका आंदोलककर्त्याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला सीपीआर देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
गोपी पिल्लई असं या आंदोलकांचे नाव असून ते ७५ वर्षाचे आहेत. ते केरळवरून सीजीपेच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. Gen Z सोबत ज्येष्ठ नागरिकही आंदोलनात CJPच्या आंदोलनात मोठ्या संख्येने Gen Z तरुण सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थिती लावत निवडणूक प्रक्रियेबाबतच्या आपल्या व्यथा मांडल्या. त्यामुळे शिवाजी पार्कातील आंदोलनात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित सहभाग पाहायला मिळाला.