मोठी बातमी ! अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा
मोठी बातमी ! अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा
img
Nandini khandare More
सध्या देशात आंदोलनावरून मोठा गदारोळ निर्माण झाला असून आता कॉक्रोच जनता पार्टीबाबत एक मोठी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला असल्याची ,माहिती समोर आली आहे. 

कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला नेहा बोरा, अभिजीत दिपके यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पत्रकार परिषद बंद करा, बंद करा अशी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  दरम्यान त्यानंतर या गोंधळावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 50, 100 रुपयांसाठी गोंधळ घालणारे हे लोकं आहेत, असं अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत पुन्हा आंदोलन 

दरम्यान दिल्लीमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सीजेपीचे सदस्य असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सर्वांनी कॅनॉट प्लेस परिसरात एकत्र यावं असं आवाहन बुधवारीच अभिजीत दिपके यांनी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद पार पडली, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं.
cjp |
इतर बातम्या
Join Whatsapp Group