यवतमाळमध्ये आज ठाकरे गटाचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आज संजय देशमुख यांचा प्रचार करणार आहेत. यवतमाळमधून संजय देशमुख महाविकास आघाडीकडून आज अर्ज दाखल करणार आहेत. याआधी संजय देशमुख जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, यवतमाळमध्ये प्रचार सुरु आहे, सभा होणार आहेत. एनडीएकडून तिथे अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. एनडीए कोणता भ्रष्ट उमेदवार देणार हे पाहावं लागेल. ते पत्रकारांशी बोलत होते.
बंडखोर आणि गद्दारांमध्ये खूप फरक
आदित्य ठाकरे यांनी यावेळी गद्दार आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, बंडखोरी आणि गद्दारांमध्ये खूप फरक असतो. 40 गद्दार होते, त्यांचं पुढचं काय याचा विचार करावा. आता पुढचं चित्र स्पष्ट झालं आहे. जिथे-जिथे गद्दारी झाली, तिथे त्यांना लोकांनी नाकारलं आहे. गेल्या 10 वर्षात भाजपने केंद्रात आणि राज्यात जी कामे करायला पाहिजे होती, ती केली नाही. सरकारने जी आश्वासन दिली होती, ती अपूर्ण आहेत.
एप्रिल फूल डे म्हणजेच अच्छे दिन
काल एप्रिल फूल डे होता, जगात एप्रिल फूल डे म्हणून साजरा होणारा दिवस आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. देशाचं भविष्य आपल्याला दिसत आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल की, इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे. काही महिने, काही दिवसापूर्वी जे यांच्या विरोधात बोलत होते, त्यांन गद्दारी केली. आता कोण-कोणत्या पक्षात आहे. सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना दिसतंय, चित्र स्पष्ट झालं आहे, असं आदित्या ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंचा गद्दारांवर जोरदार निशाणा
आदित्य ठाकरेंनी पुढे सांगितलं की, आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत. जनतचा आमच्या पाठीशी आहे. या देशात लोकशाही संपत चालली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही एकत्र येऊ जे संविधानाच्या विरोधात आहेत, संविधान संपवू पाहत आहेत, त्यांच्या विरोधात लढत आहोत. ज्यांना कुणालाही देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचं आहे, ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.